पाहा Photos:लॅक्मे फॅशन वीकच्या रेड कार्पेटवर सो कूल सोनालीच्या अदा

By  
on  

आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांवर मोहिनी घालणारी चतुरस्त्र आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सामाजिक भान जपणा-या अभिनेत्रींमध्येसुध्दा सोनालीचं नाव आग्राहानं घेतलं जात. मराठी सिनेसृष्टी असो किंवा हिंदी सोनालीचा सर्वत्रच सहज वावर पाहायला मिळतो. 

सोनाली नुकतीच लॅक्मे फॅशनवीक मध्ये एका खास अंदाजात रेड कार्पेटवर झळकली. सोनालीने प्रसिध्द डिझाईनर रितू कुमारचा खास ड्रेस परिधान केला होता आणि त्यावर साजेशी अशी ज्वेलरीसुध्दा होती. त्यामुळे सोनाली फारच आकर्षक दिसली. 

 

 

जगप्रसिद्ध इंग्रजी लेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या ‘THE MIRROR CRACK’D’ वर बेतलेल्या इंग्रजी नाटकात सोनाली झळकते आहे. मेली स्टील या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत. या नाटकात तिच्यासोबत शेरनाज पटेल आणि डेंझिल स्मिथ यांच्या भूमिका आहेत.

 

Recommended

Loading...
Share