रुपेरी पडद्यावर अवतरणार शिवगाथा, रितेश देशमुख असणार मुख्य भूमिकेत

By  
on  

छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेकदा भव्य असा सिनेमा बनवण्याबाबतची बातमी समोर आली. पण या सगळ्या शक्यताच होत्या. आता या सिनेमाबाबतची एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. रितेश देशमुख ‘छत्रपती शिवाजी’ या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसत आहे. 

 

 

शिवजयंतीचा मुहुर्त साधत या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे करणार आहेत. तर प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल या सिनेमाला संगीत देणार आहेत. रितेशने सोशल मिडियावर एक व्हिडियो पोस्ट केला आहे. तो यात सिनेमाची घोषणा करताना दिसत आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमा ट्रायोलॉजी असणार आहे. म्हणजे तीन भागात प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी सिनेमात ट्रायोलॉजीचा प्रयोग पहिल्यांदाच ‘छत्रपती शिवाजी’ या सिनेमाच्या निमित्ताने केला जाणार आहे. हा सिनेमा 2021मध्ये रसिकांच्या भेटीला येईल.

Recommended

Loading...
Share