By  
on  

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची रांगोळी तुम्ही पाहिलीत का?

सध्या दिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहतोय. त्यात सेलिब्रिटींची तर बातच न्यारी. प्रत्येक जण नटून-थटून दिवाळी साजरी करतोय. विविध पार्टीजना हजेरी लावतोय. पण आपल्या गुलाबाच्या कळीचं मात्र कलेवरचं प्रेम दिवाळीनिमित्त दिसून येतंय.अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यंदा दिवाळीत खास रांगोळी काढत सेलिब्रेशन केलं. अंगणात बसून रांगोळी काढण्याची मजाच काही और आहे, असंही ती म्हणतेय.

https://twitter.com/tejaswini_tweet/status/1060204107905015808

तिनं ही रांगोळी ट्विटर आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केली आहे. शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतानाचं एका स्त्रीचं तिनं रांगोळीद्वारे सुंदर चित्र रेखाटलं आहे. या रांगोळीसाठी तिनं विविध रंगांचा उपयोग करण्याबरोबरच सजावटीसाठी झेंडूची फुलंही वापरली आहेत.

एका कलाकाराचं कलेवरचं पडद्यामागचं हे कसबही यानिमित्ताने पाहायला मिळालं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive