मनभूमीवर विजय मिळवण्यास प्रेरित करणारा 'विजेता' मधील सुबोध भावेचा लूक पाहा

By  
on  

खेळाडूंना जिंकण्यासाठी शारीरिक क्षमतेसोबतच गरजेची असते मानसिक शक्ती. नेमका हाच संदेश घेऊन विजेता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील सुबोधचा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात तो माईंड कोचच्या भूमिकेत दिसत आहे. 
सौमित्र देशमुख असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

 

 

सुबोधने यापुर्वी सिनेमातील त्याचा लूक शेअर केला होता. हा लूक पाहता या सिनेमात तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वाटत असतानाच त्याच्या व्यक्तिरेखेचं नावही समोर आलं आहे. सुबोध भावे, पुजा सावंत, माधव देवचके, सुशंत शेलार, मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर,देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर,आणि गौरीश शिपुरकर हे या सिनेमात आहेत. विजेता हा एक स्पोर्ट्स सिनेमा आहे. सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्ससोबतचा विजेता हा सुबोधचा दुसरा सिनेमा आहे. हा सिनेमा 12 मार्च 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share