मराठीतल्या या लाडक्या कपलचा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, किती गोड !

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामत यांना ओळखलं जातं. दोघांनीसुध्दा आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात, खासगी आणि व्यावसायिक  आयुष्यात दोघंही आघाडीवर आहेत. एकमेकांना नेहमीच समजून घेणा-या या कपलकडे प्रत्येकजण एक आदर्श कपल म्हणूनच पाहतो.

सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असणारी आणि नेहमीच आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती रसिकांपर्यंत पोहचवणा-या प्रिया बापटने नुकतंच एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर चाहत्यांनी अक्षरश: लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I am sorry my eyes weren’t enough to show you that I love you @umesh.kamat @aashu.g

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

प्रिया बापट आणि उमेश मराठीतील सर्वात हॅपनिंग कपलपैकी एक आहेत. सोशल मिडियावरही त्यांचे अनेक फॉलोअर्स त्यांना सतत फॉलो करत असतात. 

दोघांचे हे फोटो चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देतात. मागच्या वर्षी त्यांची 'आणि काय हवं' ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला आली आणि ती सर्वांना प्रचंड भावली. त्यामुळे आता ते कोणत्या माध्यमातून पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Some fresh air

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat) on

Recommended

Loading...
Share