अखेर रिंकूला भेटला स्वप्नातील राजकुमार, तुम्ही ओळखलं का त्याला

By  
on  

आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुचे अनेक फॅन्स आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का रिंकू कोणाची फॅन आहे? रिंकूचं क्रश आहे विकी कौशल. रिंकूला विकी कौशलला डेट करण्याची इच्छा होती. आणि एका कारणास्तव रिंकूची ही इच्छा पुर्ण देखील झाली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bhoot movie screening.#vickykaushal#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकूने काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात अभिनेता विकी कौशलसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळी तिची आणि विकीची इतक्या लवकर भेट होईल हे तिच्या ध्यानीमनीही नसावं. पण अखेर रिंकू आणि विकीची भेट झालीच. विकीच्या ‘भूत’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान या दोघांची भेट झाली. रिंकूने या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. आता रिंकूची क्रशशी भेट झाल्यानंतर रिंकूच्या चाहत्यांना मात्र आनंद झाला की दु:ख हे सांगणं अशक्य आहे.

Recommended

Loading...
Share