By  
on  

‘पु. ल देशपांडे’येतायत सिनेमातून भेटायला, पाहा टिझर

पु. लं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. आता आनंदाची बातमी म्हणजे पु.लंच्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय. या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शन महेश मांजरेकर करत असून या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गंत ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांचा वेध घेता येणार आहे.

https://youtu.be/4GT_VNUix9E

 

विशेष म्हणजे ‘हंटर’, ‘वायझेड’ सिनेमामध्ये झळकलेला अभिनेता सागर देशमुख पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर इरावती हर्षेने सुनिताबाईंची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा पुढील वर्षी ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive