अमृता सुभाषला मिळालं हे खास गिफ्ट, वाचा सविस्तर

By  
on  

अभिनेत्री अमृता सुभाषने अलीकडेच फिल्मफेअर अ‍वॉर्ड सोहळयात ब्लॅक लेडी आपल्या नावावर केली. ‘गली बॉय’ सिनेमासाठी  सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अमृताने या सिनेमात ‘रजिया’ची भूमिका साकारली होती. 
अमृताला या अचिव्हमेंटसाठी एक खास भेटही मिळाली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I am speechless. I got this chunni as a gift for Filmfare award from Anitatai Patil, Smita tai Patil ‘s sister. When Anitatai saw Astu she had given me another chunni of Smita Tai. This chunni also belongs to Smita tai. This song is from a Marathi film called ‘Umbartha’ which is my favourite film of Smita tai. For those who don’t understand Marathi this song means” मेरी इस सूनी महफिल में मै तुम्हाराही गीत गुनगुना रही हूॅं” Smita Tai even if you are not with us physically, we will keep missing you and hearing and singing your songs.. Anitatai I love these flowers, The chunni and your letter is precious. Thank you. @filmfare @jiteshpillaai @_prat #smitapatil #missyou #loveyou #thankyou फिल्मफेअर मिळाल्याबद्दल अनिताताई पाटील म्हणजे स्मिताताई पाटील यांच्या बहीणीनं मला ही ओढणी , फुलं आणि हे पत्र पाठवलं आणि स्मिताताईच्या आठवणीनं भरून आलं. अस्तु चित्रपट पाहून अनिताताईनं स्मिताताईची एक ओढणी दिली होती. आता फिल्मफेअर साठी आशिर्वाद म्हणून स्मिताताईची ही अजून एक ओढणी .. स्मिताताई तुझी आठवण आमच्या मनांत कायम रहाणार आहे.. तुझ्याशिवायच्या या मैफिलीत आम्ही तुझे गीत गातच रहाणार आहोत.. अनिताताईनं दिलेली लीलीची फुलं या ओढणीतूनच बाहेर पडून फुलल्यासारखी वाटत आहेत. त्या फुलांच्या मंद मधुर सुवासात तू आहेस..तुझ्या गगन सदन गाण्यातल्या ओळीसारखी..”वासंतिक कुसुमातून तूच मधुर भासतेस..”

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

 

अमृताला फिल्मफेअर मिळाला यासाठी अनिता पाटील यांनी तिच्यासाठी एक खास भेट पाठवली आहे. अनिता पाटील म्हणजे अभिनेत्री स्व. स्मिता पाटील यांची बहीण. अनिता यांनी अमृताला स्मिता यांची ओढणी भेट दिली आहे. अमृताला भेट म्हणून मिळालेली ही दुसरी ओढणी आहे. यापुर्वी अस्तु सिनेमासाठी तिला एक ओढणी मिळाली होती. यावेळी भावना शेअर करताना अमृता म्हणते, ‘फिल्मफेअर मिळाल्याबद्दल अनिताताई पाटील म्हणजे स्मिताताई पाटील यांच्या बहीणीनं मला ही ओढणी , फुलं आणि हे पत्र पाठवलं आणि स्मिताताईच्या आठवणीनं भरून आलं. अस्तु चित्रपट पाहून अनिताताईनं स्मिताताईची एक ओढणी दिली होती. आता फिल्मफेअर साठी आशिर्वाद म्हणून स्मिताताईची ही अजून एक ओढणी.. 

 

 

स्मिताताई तुझी आठवण आमच्या मनांत कायम रहाणार आहे.. तुझ्याशिवायच्या या मैफिलीत आम्ही तुझे गीत गातच रहाणार आहोत.. अनिताताईनं दिलेली लीलीची फुलं या ओढणीतूनच बाहेर पडून फुलल्यासारखी वाटत आहेत. त्या फुलांच्या मंद मधुर सुवासात तू आहेस..तुझ्या गगन सदन गाण्यातल्या ओळीसारखी..”वासंतिक कुसुमातून तूच मधुर भासतेस..” अमृताने तिचा ओढणीसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

Recommended

Loading...
Share