By  
on  

Video: आभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हा रणरागिणी अवतार तुम्हाला नक्कीच आवडेल

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छ्त्रपती संभाजी महाराज साकारणा-या अमोल कोल्हेंची जितकी प्रशंसा झाली तितकीच येसूबाई साकारणा-या प्राजक्ता गायकवाडचंही कौतुक झालं. शालीन पण खंबीर येसूबाई प्राजक्ताने उत्तम साकारली आहे. संभाजी महाराजांसोबत तलवारबाजी, घोडेस्वारीही येसूबाईनी सहज केली.

 

 

प्राजक्तालाही  येसूबाई साकारण्यासाठी तलवारबाजी, लाठीकाठी आणि घोडेस्वारी शिकावी लागली. या कलाप्रकारातील तिच्या कौशल्याचा प्रत्यय अलीकडेच आला. प्राजक्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने लाठी-काठीचं कौशल्य प्रेक्षकांना दाखवलं. कधी दोन्ही हातांनी तर कधी एका हाताने लाठी चालवत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive