‘सविताभाभी’ अडकली पेचात, मिळाली लीगल नोटीस

By  
on  

 पुण्यात काही दिवसांपुर्वी 'सविता भाभी... तू इथंच थांब' असं लिहिलेलं पोस्टर लागले होते. यामागे आहेत ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’. हे कोणतंही मंडळ नाही तर हा सिनेमा आहे. या सिनेमात पर्ण पेठे, अभय महाजन आणि सई ताम्हणकर, अक्षय टांकसाळे हे कलाकार आहेत. हा सिनेमा मात्र आता अडचणीत सापडताना दिसत आहे. या सिनेमातील सविता भाभी या कॉमिक व्यक्तिरेखावरुन वाद निर्माण झाला आहे. 

 सविताभाभी ही व्यक्तिरेखा कॉमिक कॉपीराइट असल्याचं निलेश गुप्ता यांचं म्हणणं आहे. यासोबतच सिनेमाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या सिनेमात सविताभाभी हे पात्र असण्याबाबत  कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, असं या कायदेशीर नोटिसीचं म्हणणं आहे. 

या सिनेमाचं दिग्दर्शन आलोक राजवाडे करत आहे. येत्या ६ मार्च रोजी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

 

Recommended

Loading...
Share