By  
on  

जेव्हा जेम्स बॉन्ड मराठी भाषेत बोलतो, पाहा ‘नो टाइम टू डाय’चा मराठी ट्रेलर 

जगप्रसिद्ध जेम्स बॉन्ड सिरीजचा आता 25वा सिनेमा भेटीला येत आहे. नो टाइम टू डाय असं या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरविषयीची एक गोष्ट आकर्षणाचा भाग ठरतेय. या सिनेमाचा ट्रेलर तब्बल 10 भाषांमध्ये प्रदर्शित झालाय. 2 एप्रिल 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून सध्या सोशल मिडीया या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. 


10 भाषांमध्ये या सिनेमाचा ट्रेलर आल्यानं हा सिनेमा विविध भाषांमध्ये पाहणं रंजक ठरेल. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 2 एप्रिल रोजी हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. 

मात्र मराठी भाषेतील या सिनेमाचा ट्रेलर पाहणही रंजक ठरतय. या ट्रेलरमध्ये जेम्स बॉन्ड आणि इतर कॅरेक्टर्स हे मराठी भाषा बोलताना अर्थात मराठी भाषेत त्यांचे संवाद डब करण्यात आले आहेत. तेव्हा जेम्स बॉन्डचे मराठी भाषेतील संवाद ऐकायला आणि पाहायला नक्कीच मजा येईल. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive