By  
on  

पाहा Photos : डॉक्टर डॉनची ही डार्लिंग डीन अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही आहे अग्रेसर

ती प्रसिध्द अभिनेत्री आहेच. छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमधून तिने साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. विशेष करुन ती साकारत असलेल्या नकारात्मक भूमिकांचं प्रचंड कोतुक झालं, पण इथवरच ती थांबली नाही तर प्रसिध्द मालिकांची यशस्वी निर्माती म्हणून आज ती ओळखली जाते. तुम्ही  बरोबर ओळखलंत.....आम्ही सांगतोय अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदेबद्दल. 'डॉक्टर डॉन'ची डार्लिंग डीन म्हणून श्वेता ब-याच काळानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 

 'डॉक्टर डॉन' मालिकेतील श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांच्या अफलातून लव्ह केमिस्ट्रीची सद्या बरीच चर्चा रंगलीय. श्वेता रंगवत असलेल्या डॉक्टर डीनच्या प्रेमात फक्त  देवाच नाही तर चाहतेसुध्दा पडले आहेत. 

झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ या प्रसिध्द मालिकेची ती निर्माती होती. महाराष्ट्रातील सैनिकाच्या प्रेमकथेवर खुलणा-या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर श्वेताची निर्मिती असलेली मिसेस मुख्यमंत्री ही नवीकोरी मालिका याच वाहिनीवर दाखल झाली आणि ती मालिका रसिकांच्या मनात स्थान निर्माण करतेय. 

‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी  मालिका तर  'वादळवाट', ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांतील सशक्त भूमिकांमुळे श्वेताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive