By  
on  

 बिग बॉस मराठी सिझन-3 मध्ये हे कलाकार असण्याची शक्यता, पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी 

2018 मध्ये बिग बॉस हा शो मराठीतही आला. 2018 मध्ये बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व आणि 2019 मध्ये दुसरं पर्वही आलं. आणि आता मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता सगळ्यांना आहे. येत्या 12 एप्रिल, 2020 पासून मराठी बिग बॉस सिझन 3 सुरु होण्याची शक्यता आहे. शिवाय यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून असतील याची संभाव्य स्पर्धकांची यादी नुकतीच समोर आली आहे. यात या कलाकारांची नावं चर्चेत आहेत, 


समीर चौगुले – नाटकांमधून, विनोदी रिएलिटी शोमधून आणि सिनेमांमध्ये विनोदी कलाकार म्हणून उत्तम अभिनय करणारे समीर चौगुले यांची ओळख आहे. समीर यांनी बऱ्याच विनोदी रिएलिटी शोमध्ये कामं केली आहेत. 


रुपल नंद –  रुपल ही मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा असून तिने काही मराठी सिनेमांमध्येही काम केलेलं आहे. 


आनंद इंगळे – मराठी नाटक, मालिका, चित्रपटातील विनोदी भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले कलाकार म्हणून आनंद इंगळे यांची ओळख आहे. 


अंशुमन विचारे – मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारा प्रसिद्ध अभिनेता अभिनेता म्हणून अंशुमन विचारेची ओळख आहे. अंशुमनने बऱ्याच विनोदी शोमध्येही कामं केली आहेत. 


नेहा जोशी – मराठी नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम करणारी एक उत्तम अभिनेत्री म्हणून नेहा जोशीची ओळख आहे. नेहाने काही हिंदी सिनेमांमध्येही कामं केली आहेत. 


ऋषी सक्सेना –  'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेतून ऋषी सक्सेना प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यानं काही मालिकांमध्येही कामं केली आहेत. सध्या ऋषी मराठी अभिनेत्री ईशा केसकरसोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत असतो. 


खुशबू तावडे – खुशबू तावडे हा मराठी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा असून खुशबूने काही हिंदी मालिकाही केल्या आहेत. खुशबूने आत्तापर्यंत एक मराठी सिनेमा केला आहे. 


प्रणित हाटे (गंगा)– प्रणित हाटे हा ट्रान्सजेंडर असून सध्या तिचं गंगा असं नाव आहे. युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये गंगा सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे.


शिबानी दांडेकर – शिबानी ही एन्कर, मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काम करते. शिबानी सध्या अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरसोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत असते. 


आनंद काळे – आनंद काळे यांची मराठी आणि हिंदीतील अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. 


कमलाकर सातपुते – मराठी नाटक, मालिका, सिनेमे आणि विनोदी रिएलिटी शोमध्ये कमलाकर सातपुते यांनी खासकरुन विनोदी भूमिका साकारल्या आहेत. 


चिन्मय उदगीरकर – मराठी मालिका आणि सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून चिन्मयची ओळख आहे. 


नक्षत्रा मेढेकर – मराठी मालिका आणि सिनेमांमधील प्रसिद्ध सुंदर अभिनेत्री म्हणून नक्षत्राची ओळख आहे. 


निशिगंधा वाड – मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांमधील प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार म्हणून निशिगंधा वाड या संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत 


 पल्लवी सुभाष – हिंदी आणि मराठी मालिका आणि मराठी सिनेमांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पल्लवी सुभाषची ओळख आहे. 


शुभांकर तावडे – शुभांकर हा प्रसिद्ध अभिनेता सुनिल तावडे यांचा मुलगा असून शुभांकर हा मराठी नाटक, मालिका, सिनेमांमध्ये काम करणारा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. 


केतकी चितळे –  मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून केतकीची ओळख आहे. एका मराठी मालिकेतून आजारपणामुळे रिप्लेस केल्याचा केतकीचा मुद्दा चर्चेत आला होता.

 
नम्रता संभेराव – नम्रता ही तिच्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असून मराठी नाटक, मालिकांमध्ये विनोदी भूमिका साकारते. या स्पर्धकांची नावं सध्या चर्चेत आहेत. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive