By  
on  

'माझ्या बायकोचा प्रियकर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजीव एस. रूईया यांनी केलं आहे. सिनेमाच्या नावातच कथा लपली आहे. विनोदी व कौटुंबिक पार्श्वभूमीवर कथा आधारित असल्यामुळे प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन होऊ शकतं. नुकतंच या सिनेेमाचं दुसरं पोस्टर लाँच करण्यात आलं. अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासराव या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत धम्माल उडवून देणार आहेत.
प्रियदर्शन व अनिकेतसोबत भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, स्वाती पानसरे, अंशुमन विचारे, पदम सिंह, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची पटकथा अभिजित गाडगीळ तर संवाद संदीप दंडवते यांनी लिहिली आहे.  राजकला मूव्हीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे .दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत.
येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या सिनेमाचे पेन मुव्हीज हे प्रस्तुतकर्ता आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive