By  
on  

राज्य शासनाचा मोठा निर्णय, देणार डॉ. श्रीराम लागूंच्या नावाने पुरस्कार

शंभरहून अधिक हिंदी आणि मराठी सिनेमात काम केलेले अभिनेते श्रीराम लागू यांचं 18 डिसेंबर 2019 रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेमाचा आधारवड निघून गेल्याची भावना व्यक्त केली जात होती.रंगभूमी आणि सिनेमामध्ये डॉ. लागूंचं भरीव योगदान आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन राज्यशासनाने त्यांच्या नावे पुरस्कार जाहीर केला आहे.

 

 

राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. रंगभूमीवरील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ‘नटसम्राट श्रीरामलागू’ असं या पुरस्काराचं नाव असणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive