By  
on  

Exclusive: काजोल, मी आणि नीनाताईंनी मराठीत खुप गप्पा मारल्या : मुक्ता बर्वे

स्त्रिचा आत्मसन्मानाची गोष्ट सांगणा-या ‘देवी’ या शॉर्टफिल्मची प्रेस कॉन्फरन्स नुकतीच पार पडली. मराठी आणि बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री यात काम करत आहेत. नऊ अत्याचारग्रस्त महिलांच्या कथेभोवती ही शॉर्टफिल्म आकार घेईल. या शॉर्टफिल्ममध्ये मुक्ता बर्वे एका मुस्लीम महिलेची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. 

यावेळी पीपिंगमूनशी मुक्ताने एक्सक्लुसिव्ह बातचीत केली. मुक्ता म्हणते, काजोलसोबत काम करण्याचा अनुभव खुपच सुंदर होता. खरंतर आम्ही नऊ जणी सेटवर होतो. आमच्या प्रत्येकीची काम करण्याची पद्धत वेगळी होती. पण काजोलबाबत मला एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते की, तिने टीमसोबत अनेकदा रिहर्सल केली. साधारण मराठी नाटकांसाठी अशा तालीमी चालतात. पण हिंदीमध्येही अशा तालीमी होताना पाहून छान वाटतं. खरं तर माझ्यासाठी हिंदी माध्यमात काम करण्याच्या अनुभव खुप छान होता. 

या फिल्ममधील प्रत्येक स्त्रीवर अन्याय झाला आहे. आज आपण समाजातही पाहतोच की अनेकदा अगदी सहा महिन्यांच्या मुलीपासून ते अगदी वयस्कर महिलांवरही अत्याचार होताना दिसतात. या घटना खरोखरीच लाजिरवाण्या आहेत. या शॉर्टफिल्म मधून त्यावर भाष्य केलं आहे. 
सेटवरील वातावरणाबाबत बोलायचं झालं तर खुपच छान होतं. नीनाताई, मी आणि काजोल मिळून धमालही केली. काजोल अस्खलिखित मराठी बोलते. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना, गप्पा मारताना मजा आली.

Recommended

PeepingMoon Exclusive