By  
on  

अभिनेत्री केतकी चितळेवर भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळे सोशल मिडियामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. केतकी यावेळी समोर आली आहे ते तिच्या पोस्टमुळे. केतकीने अलीकडेच हिंदुत्त्वाचं समर्थन करणारी पोस्ट टाकली होती. पण या पोस्टमध्ये ‘नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क.’ असंही नमूद केलां होतं. 

 

 

तिच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) मुंबई प्रदेश अध्यक्ष राजू थाटे यांनी केतकीविरोधात मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली आहे. यावर केतकीची प्रतिक्रिया अजून समोर येऊ शकली नाही. केतकी तिच्या या पोस्टमुळे ट्रोल होत आहे. केतकी यापुर्वीही मराठी अस्मितेवर टीका केल्याप्रकरणी ट्रोल झाली होती. यावेळी तिच्यापोस्टवर अश्लील कमेंट करणा-यांबाबत तिने चांगलीच कान उघडणी केली होती.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive