By  
on  

कॉपीराइट वादावर निघाला तोडगा पण सिनेमात 'सविता भाभी’ झाली म्युट

काही दिवसांपुर्वी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या सिनेमातील सविता भाभी या कॉमिक व्यक्तिरेखावरुन वाद निर्माण झाला होता. सविताभाभी ही व्यक्तिरेखा कॉमिक कॉपीराइट असल्याचं निलेश गुप्ता यांचं  म्हणणं होतं. यासोबतच सिनेमाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली होती. 
निलेश यांनी हे नाव बदलण्याची मागणी केली होती.

पण सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्याने हे शक्य नसल्याचं ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’च्या दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. या वादावर आता पडदा पडताना दिसणार आहे. निलेश गुप्ता आणि अश्लील उद्योग सिनेमाच्या टीम मध्ये करार झाला असून सिनेमाच्या रिलीज चा मार्ग मोकळा झाला आहे. 

या कराराचं नाव ‘सविता भाभी’ करार असं ठेवण्यात आलंय. या करारानुसार सिनेमातील सविता भाभी हा त्या जागी म्युट असेल. सिनेमाचं सविता भाभी हे गाणं ही प्रमोशन मधून आणि युट्युबवरून वगळण्यात आल्याचं सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती देण्यात आली  यावेळी स्वतः निलेश गुप्ता , सिनेमाचे निर्माते डॉ. अंबरीष आणि सिनेमाचे दिग्दर्शक आलोक राजवाडे उपस्थित होते. येत्या 6 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive