By  
on  

'दिल दोस्ती'फेम पुष्कराज चिरपुटकर पु,ल. देशपांडेंच्या व्यक्तिरेखेत

'दिल दोस्ती दुनियादारी'मधील साधा-भोळा पण तितकाच मस्तीखोर आशू आठवतोय. दोस्तांचा दोस्त आणि जीवाला जीव देणारा. सर्वांचाच लाडका हा आशू म्हणजेच अभिनेता पुष्कराज चिरपुटकर. मध्यंतरी पुष्कराजच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेले बापजन्म व मंत्र हे दोन सिनेमे रसिरकांच्या भेटीला आले होते, पण त्यानंतर तो कुठेच दिसला नाही.  

आता पुष्कराज आगामी 'मी वसंतराव' यांच्या सिनेमात पु.ल देशपांडेची व्यक्तिरेखा साकारतोय. अनेकांनी आजवर पु.ल साकारले आहेत, परंतु पुष्कराजला त्यांच्या व्यक्तिरेखेत पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भूमिका प्रेक्षकांना भावली तर ते श्रेय प्रेक्षकांचंच असेल असंही तो म्हणाला. 

आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नवनवीन गोष्टी तो प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. आणि आता मी. वसंतराव या चित्रपटाद्वारे तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून त्यांच्या आजोबांची म्हणजे वसंतरावांची भूमिका साकारणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनीता दाते, अमेय वाघ, कौमुदी वलोकर मुख्य भूमिकेत असणार आहेत तर निपुण धर्माधिकारी याने सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

'मी वसंतराव' नंतर पुष्कराज आगामी 'मिडीयम स्पायसी' सिनेमात झळकणार आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive