By  
on  

ठरलं तर ! अमेय खोपकरच करणार ‘दे धक्का 2’ ची निर्मिती, उच्च न्यायालयाने दिला निकाल

पुन्हा एकदा ११ वर्षांनी  दे धक्का सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. त्यावेळी अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट या सिनेमाची निर्मिते करणार असल्याचं समोरही आलं होतं. पण दे धक्काची निर्मिती झी स्टुडियोज केली होती. त्यामुळे दुस-या भागची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटला करता येणार नाही असा झी स्टुडियोजचा दावा होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ameya Khopkar (@ameyakhopkar) on

 

हा वाद न्यायप्रविष्टही होता. यावर उच्च न्यायालयाने अलीकडेच निकाल दिला आहे. या सिनेमाच्या निर्मितीचा अधिकार अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटला असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. दे धक्का मधील मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही दे धक्का २ मध्ये दिसेल.  महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दे धक्का २ चं दिग्दर्शन करणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive