By  
on  

पाहा Teaser: स्वप्निल जोशीचं सिनेमांसह 'समांतर' वेब पदार्पण

लाडका चॉकलेट बॉय आणि आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. तुम्ही म्हणाल आता कोणता नवा सिनेमा आहे, ज्याची स्वप्निल घोषणा करतोय. अहो, सिनेमा नाही तर हा मराठी सुपरस्टार चक्क वेबविश्वात दमदार  पदार्पण करतोय आणि त्याच्या पहिल्या- वहिल्या वेबसिरीजची एक झलक सुध्दा नुकतीच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाली आहे. 'समांतर' असं स्वप्निलच्या  वेब सिरीजचं नाव आहे. 

'समांतर' या मराठी एम एक्स ओरिजिनल वेबसिरीजचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. तर या वेबसिरीजमध्ये स्वप्निल जोशी सोबतच तेजस्विनी पंडित सुद्धा झळकणार आहे. एका सामान्य इसमाच्या भूमिकेत स्वप्निल पाहायला मिळतोय.  या वेबसिरीजमध्ये स्वप्निल कोणाचा तरी शोध घेत आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे, सुदर्शन चक्रपाणी. ह्या व्यक्तीचा तो कसून शोध घेताना टीझरमध्ये पाहायला मिळतोय. ती व्यक्ती त्याच्या जीवावर तर नाही ना उठली म्हणून तो त्याच्या शोधात आहे, असं चक्रावून ठेवणारं  रहस्यमय शोधाचे कथानक असणार असं दिसंतय. 

'समांतर' वेबसिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला तर, येत्या ९ मार्चला या वेबसिरीजचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला येतोय. स्वप्निल जोशीच्या या पहिल्या वहिल्या वेबसिरीजची रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive