By  
on  

शशांक केतकरचा सुजयला सल्ला, 'कृपा करून हे असले स्टंट करू नकोस'

दिग्दर्शक सुजय डहाकेने केसरी सिनेमाच्या निमित्ताने अलीकडेच एका प्रथितयश वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी त्याने सिनेसृष्टीत ब्राम्हणी वर्चस्व असल्याचं विधान केलं. सुजय म्हणतो, ‘मराठी मनोरंजन श्रेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?’ असा सवाल सुजयने यावेळी उपस्थित केला होता. त्यावरून आता अनेक कलाकारांनी या वक्तव्याचा निषेध करत मत प्रदर्शित केलं आहे. 

 

 

अभिनेता शशांक केतकरनेही सोशल मिडियावरून सुजयला सुनावलं आहे. शशांकने सुजयचा आरोप फेटाळत पोस्ट शेअर केली आहे. शशांक त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो,
‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे.कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्या पेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास.
साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? असो .....दुसानिस ही माझी सह कलाकार आणि शेलार आणि गुप्ते या आडनावाच्या अभिनेत्री माझ्या आई ची भूमिका करतात ! कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे.तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालुदे हीच इच्छा आहे तुझ्या reference साठी ही एक FB post वाच -
"सुरू असलेल्या मालिका "
बाळू मामा - कोमल मोरे
राजा राणी - शिवानी सोनार
छत्रपती संभाजी - प्राजक्ता गायकवाड
स्वामींनी - सृष्टी पगारे
Mrs मुख्यमंत्री - अमृता घोंगडे
विठू माउली - एकता लब्धे
प्रेमाचा गेम सेम टू सेम - सायली जाधव
वैजु नं 1 - सोनाली पाटील
"या पूर्वीच्या मालिका "
तू अशी जवळी रहा - तितिक्षा तावडे
आम्ही दोघी-. खुशबू तावडे
मानसीचा चित्रकार तो -अक्षया गुरव
एक राजकन्या - किरण धाणे
जुळून येती रेशीमगाठी. - प्राजक्ता माळी
छत्री वाली - नम्रता प्रधान
साता जन्माच्या गाठी - अक्षया हींदलकर
सगळ्या उत्तम अभिनेत्री आहेत, आणि त्यांना टॅलेंट मुळे कामं मिळाली आहेत..
कोणतही चॅनल जात , धर्म बघून काम देत नाही तर talent बघून काम देत..
असो. सुजयच्या या विधानावर अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही पोस्ट केली आहे. याशिवाय जयवंत वाडकरांनीही याविषयी पोस्ट व्यक्त केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive