By  
on  

सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘वर्ल्ड कप जिंकूनच या !’

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडियावर कायमच अ‍ॅक्टीव असते. अनेक सामाजिक मुद्द्यावर ती स्पष्ट मत मांडत असते. आताही सोनालीने एका मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. सोनाली भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 

 

 

भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोनालीही क्रिकेटची चाहती आहे. मागील वर्षी मेन्स वर्ल्ड कप वेळी सोनालीसुध्दा टीम इंडियाला चियर करायला चक्क इंग्लंडमधील स्टेडिअमध्ये हजर होती.

Recommended

PeepingMoon Exclusive