By  
on  

सावरकरांच्या संघर्षाने कायमच प्रेरणा दिली आहे: आरोह वेलणकर

स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अलौकिक योगदान आहे. त्यांचा त्याग आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो. नेमकं हेच हेरून अभिनेता आरोह वेलणकर ‘वीर’ ह्या सिनेमॅटिक स्टेज शोव्दारे विनायक दामोदर सावकरांचं जीवननाट्य दिग्दर्शित करत आहे. शीवलीला फिल्म्स निर्मित हे नाटक 30 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नुकतंच वीर नाटकाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कलाकृतीविषयी दिग्दर्शनात पदार्पण करणारा अभिनेता आरोह वेलणकर म्हणतो, खरंतर अभिनय आणि दिग्दर्शन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण अभिनेता कलाकृती साकारतो तेव्हा तो व्यक्तिरेखेला एक दिशा दाखवत असतो. तेच दिग्दर्शक व्यक्तिरेखा उभी करताना अभिनेता होत असतो. त्यामुळे दिग्दर्शनात पदार्पण करताना फारसं वेगळं जाणवलं नाही. 

वीर नाटकाचे निर्माते शिवम लोणारी हे पहिल्यांच नाटकाची निर्मिती करत आहेत. यापूर्वी शिवलीला फिल्म्सव्दारे त्यांनी ‘बर्नी’, ‘चिनु’, ‘साम दाम दंड भेद’ आणि ‘गुलदस्ता’ अशा सिनेमांची निर्मिती केली आहे. या नाटकात वीर सावरकरांच्या भूमिकेत फर्जंद फेम अभिनेता निखील राऊत दिसणार आहे. या भूमिकेविषयी तो म्हणतो, ‘मला या व्यक्तिरेखेचं दडपण अजिबात आलेलं नाही.

कारण मी दुस-यांदा सावरकर साकारत आहे. या नाटकाच्या माध्यमातून सिनेमाचा फिल प्रेक्षकांना घेता येईल.’ नाटकामध्ये अभिनेता निखील राऊतशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीलम पांचाळ मुख्य भूमिकेत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive