By  
on  

Womans Day special: हे सिनेमे पाहून साजरा करा तुमचा महिला दिन

आज सगळीकडे महिला दिनाचा माहोल आहे. महिला दिन आणि रविवार असा संगम आला आहे. महिला दिनाचा हा रविवार तुम्ही खास बनवू शकता वेगळ्या पद्धतीने. मराठी सिनेमाने आजवर अनेक उत्तमोत्तम नायिकाप्रधान सिनेमे दिले आहेत. आजच्या दिवसाचं औचित्य साधत हे सिनेमे जरूर पाहा. 

मुक्ता: 
पारंपरिक वळणाच्या घरात मोकळ्या विचारांची मुक्ता आजच्या स्त्रीचं उत्तम उदाहरण आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा नक्कीच पाहावा. 

उंबरठा: 
अभिनय क्षेत्रातील खणखणीत नाणं म्हणजे स्मिता पाटील. करीअरीस्ट, सक्षम पण संवेदनशील स्त्री स्मिताने या सिनेमातून उभी केली. स्मिता आणि गिरीष कर्नाड यांच्या अभिनयाने या सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. 

न्युड: 
एका वेगळ्याच विषयाला हात घालणारा सिनेमा. स्त्रीमनाचा आणखी एक नवा पैलू या सिनेमाने उलगडला. कल्याणी मुळे आणि छाया कदम यांनी या सिनेमाला चार चांद लावले. 

वजनदार: 
परफेक्ट दिसण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीला असते. त्यातूनच वजन कमी करावं अशी इच्छा प्रत्येकीची  होते. ‘वजनदार’ हा सिनेमा त्यावरच बेतला आहे. मनोरंजन करता करता हा सिनेमा विचार करायला भाग पाडतो. 

आनंदी गोपाळ: 
पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर बेतलेला सिनेमा एक वेगळी दृष्टी देतो. आनंदीबाईंचा त्याग, कष्ट आणि प्रबळ इच्छाशक्तीचं दर्शन या सिनेमातून घडतं. 

हिरकणी: 
स्त्रीचं गौरवलं गेलेलं रुप म्हणजे आईचं. जेव्ह तिचं मुलं संकटात असतं. त्यावेळी एरवी कोमल असणारी स्त्री ज्यावेळी आई बनते तेव्हा कोणत्याही संकटाला पाठीवर घेण्यासाठी तयार असते. हिरकणीचा हा संघर्ष पडद्यावर पाहणं प्रेरणा देऊन जातो.

 

Recommended

PeepingMoon Exclusive