करोनाचं सावट, अभिनेता सुबोध भावेला घ्यावा हा लागला निर्णय

By  
on  

करोनाने जगभर थैमान घातलं आहे. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढतोय, लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनसुध्दा करण्यात येत आहे. मनरंजनविश्वानेसुध्दा करोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. मराठी मालिकांच्या सेटवरही करोनाविरोधात पुरेपूर खबरदारी घेण्यात येत असल्याचं वृत्त आहे, तर बॉलिवूड सिनेमाचं अनेक परदेशी दौ-यांवर होणारे शूटींग शेड्यूल रद्द करण्यात येत आहेत. 

बॉलिवूडमधील काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखासुध्दा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कळत असतानाच आता मराठी सिनेसृष्टीवरसुध्दा करोना इफेक्ट जाणवू लागला आहे. प्रसिध्द अभिनेता सुबोध भावेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे अमिरेका दौरा रद्द करण्यात आल्याचं सुबोधने सोशल मिडीयावरुन स्पष्ट केलं आहे. 27 मार्च ते 26 एप्रिल या काळात अमेरिकेत नाटकाचे प्रयोग होणार होते, परंतु ते आत्ता रद्द करण्यात आले आहेत. तसंच सुबोध असंही म्हणतो, "करोना हा काही विनोदाचा विषय नाही,सगळंच भान सोडण्याच्या काळात किमान ज्यांचा जीव गेलाय त्यांच तरी भान बाळगूया,स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या आणि सुरक्षित रहा" 

इतकंच नव्हे तर सांगलीत पार पडणा-या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनावरसुध्दा करोनाची टांगती तलवार आहे. वाढत्या गर्दीच्या कारणास्तव हे संमेलन रद्द करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Recommended

Loading...
Share