By  
on  

आणि इनामदारांच्या वाड्यावर १७ वर्षांनी भरत आला परत

‘सूड दूर्गे सूड’....’बाबा लगीन बाबा लगीन’...,’ ए डोळे बघ डोळे   बघ‘.. हे संवांद आठवतात ना .... मग हा सिनेमा आणि यातला वाडा तुम्ही कधीच विसरु शकत नाहीत. तीन दोस्तांना सळो की पळो करुन सोडणा-या व इनामदारांच्या वाड्यातील अकल्पित घडण्या-या विनोदी शैलीतील भन्नाट प्रसंगांनी आणि घटनांमुळे पछाडलेला हा सुपरहिट हॉरर-कॉमेडी सिनेमा ठरला. सिनेमातली गाणी व सर्वच पात्रं हीट ठरली. आजही महेश कोठारे यांची दिग्दर्शन व  निर्मिती असलेला हा लोकप्रिय सिनेमा बच्चेकंपनींपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण तितक्याच आवडीने पाहतात.

भरत हेच मुख्य पात्र सिनेमात साकारणारा अभिनेता भरत जाधव नुकतंच तब्बल १७ वर्षांनंतर  या इनामदारांच्या वाड्यावर परत आला होता. त्यामुळे त्याने भावूक होत वाड्याच्या फोटोसह एक पोस्ट सोशल मिडीयावरुन हत्यांपर्यंत पोहचवली. भरत म्हणतो, “आज १७ वर्षांनंतर पाय इनामदारांच्या वाड्याकडे आपसूकच वळले. इथे अजुनही त्यांचा भास होतो...!!” 

भरतसह त्याच्या पत्नीनेही या वाड्याला भेट दिली. भरत जाधवने केलेल्या या फोटोंवर चाह्त्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तर भरतला ‘पछाडलेला २’ येतोय का सर, म्हणून थेट सवाली केलाय. त्यामुळे भरतच्या या वाड्याला भेट देण्यामागचं कारण लवकरच उलगडेल यात शंका नाही.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

भरतच्या या पोस्टमुळे पछाडलेला सिनेमाच्या आठवणींना अनेक वर्षांनंतर उजाळा मिळाला आहे.  भरत जाधव सोबतच, मेघा घाडगे, अभिराम भडकमकर, श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर आदी कलाकारांच्या सदाबहार अभिनयाने हा सिनेमा सजला. जर या सिनेमाचा सिक्वल आला तर प्रेक्षकांना नक्कीच तो आवडेल यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive