By  
on  

करोना इफेक्ट: नाट्यगृहबंदीमुळे रंगमंच कामगार आर्थिक अडचणीत

करोनाचा प्रभाव सर्वत्र ठळकपणे जाणवत आहे. सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद केली आहेत. नाट्यगृहांच्या बंदीमुळे नाटकांचे शो अचानक रद्द करावे लागले. त्यामुळे या नाटकांमधील हातावर पोट असलेल्या जवळपास 700 कामगारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. 

खरं पाहता नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग शनिवारी- रविवारपासून होत असतात. यावेळी ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून नाटकांची तिकीटं विकली गेली होती. पण प्रयोगच रद्द झाल्याने या कामगारांचं वेतन बुडालं. रंगमंच कामगार संघटनेने प्रत्येकी 2 हजार रुपये कामगारांना देऊ केले आहेत. कामगार अडचणीत असताना तात्पुरती मदत करणंही गरजेचं असल्याचं रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्हे यांनी स्पष्ट केलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive