By  
on  

 स्वप्निल आणि तेजस्विनीने ऑनस्क्रिन केलं किस, होत आहे या सीनची चर्चा 

मराठी सिनेमांमध्ये इंटिमेट सीन, किसींग सीन असणं आता काही नवीन राहिलेलं नाही. मात्र त्यातही हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी सिनेमांमध्ये ते फारस कमीच असतं. मात्र वेब प्लॅटफॉर्ममुळे अशा सीनवर बंधने नसतात, असं असलं तरी वेबवरील मराठी सिरीजमध्ये या गोष्टी कमी प्रमाणातच पाहायला मिळतात. यातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समांतर या वेब सिरीजमधील एक सीन सध्या चर्चेत आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीजमध्ये दोघं पति पत्निच्या भूमिकेत आहेत.  या वेब सिरीजमध्ये  दोघांचा किसींग सीन असल्यामुळे सध्या त्याचीही चर्चा होत आहे. एक नाही तर दोन सीनमध्ये स्वप्निल आणि तेजस्विनी स्मूच करताना दिसत आहेत. मात्र स्वप्निल आणि तेजस्विनी चांगले मित्र असल्याने शिवाय याआधीही त्यांनी एकत्र काम केलं असल्याने या दोघांची चांगली केमिस्ट्री या सिरीजमध्ये पाहायला मिळते. 

याआधी स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णीचा किसींग सीन ‘मितवा’ या मराठी सिनेमात होता. मात्र तेजस्विनी पंडीतने अशा प्रकारचा सीन पहिल्यांदाच दिलं असल्याचं बोललं जातय. शिवाय या वेब सिरीजमधील तिच्या भूमिकेचही तितकचं कौतुक होत आहे. 


ही वेब सिरीज मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाली आहे.
 

Recommended

PeepingMoon Exclusive