By  
on  

जोडी तुझी माझी..प्रेमात आकंठ बुडाले सखी-सुव्रत !

दिल दोस्ती दुनियादारी मधून त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली आणि  दिल दोस्ती दोबारा, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक यातून ती हळूहळू फुलत गेली. त्यानंतर मग आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याच्या त्यांनी आणाभाका घेतल्या. 

मागच्या वर्षी कर्जतच्या सगुणा बागमध्ये निसर्गाच्या सानिध्यात फक्त जवळचे काही नाते वाईक व सिनेसृष्टीतील मित्रमंडळी यांच्या साक्षीने ते विवाहबंधनात अडकले. त्यांचं लग्न हे सिनेसृष्टीतलं एक चर्चित सोहळा ठरला. 


सखी लग्नानंतर उच्चशिक्षणासाठी लंडनमध्ये आहे तर सुव्रत सिनेमांच्या शूटींगसाठी मुंबईत असतो. त्यामुळे लग्नानंतरसुध्दा दोघंही लॉंग डिस्टन्समध्ये राहत होते. प्रत्यक्ष भेटून प्रेम व्यक्त करणं कठीण असलं तरी दोघंही अनेकदा सोशल मिडीयावरुन रोमॅंण्टीक फोटो पोस्ट करत असतात आणि चाहतेसुधदा त्या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतात. 

असाच एक क्युट फोटो नुकताच सखीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.हा क्युट फोटो चाहत्यांना भलताच आवडलाय आणि त्यावर त्यांनी भरभरुन कॉमेंट्स दिल्या आहेत. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive