By  
on  

Photos : प्रिया बापट म्हणते,'बैठे बैठे क्या करें करना है कुछ काम ...'

करोनाच्या सावट जगभर पसरलं असताना आता दैनंदिन जीवनही कोलमडलं आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वांना सक्तीने खबरदारी म्हणून घरातच रहावं लागत आहे. कोणी पुस्तकाचा आधार घेतंय तर कोणी कुटुंबियांना वेळ देतंय तर कोणी संगीत अथवा घरच्या घरी व्यायाम करायला प्राधान्य देत आहे. 

सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट या सक्तीच्या रजेनिमित्ताने म्हणते, बैठे बैठे क्या करें करना है कुछ काम शुरु करो photo post करना लेकर प्रभु का नाम. असं म्हणत तिने आपले आधीचे फोटोशूट केलेले फोटो पोस्ट करण्याचा नवा उद्योग सुरु केला आहे. 

ऑरेंज क्रॉप टॉप आणि लॉंग बेलबॉटम डेनिममध्ये ती खुप सुरेख दिसतेय. ती हे भीतीचं वातावरण थोडं हलकं-फुलकं करण्यासाठी असे पोस्ट करतेय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive