By  
on  

यंदाचा वाढदिवस कुटूंबासोबत नाही तर चाहत्यांसोबत - अमृता खानविलकर

अमृता खानविलकर आपल्या वाढदिवसानिमित्ताने नुकतीच आपल्या चाहत्यांना भेटली. मुंबईत आयोजित केलेल्या ह्या खास 'मीट अॅन्ड ग्रीट' नंतर पीपींगमून मराठीने अमृताशी ह्या अनुभवाविषयी संवाद साधला. चाहत्यांना भेटून खूश झालेली अमृता म्हणाली, "माझ्यावर भरभरून प्रेम करणा-या ह्या चाहत्यांना भेटल्यावर  मला आता जास्त जबाबदारीने वागण्याची जाणीव झालीय. सोशल मीडीयामूळे आता तुमचे चाहते तुमच्या प्रत्येक गोष्टीचे खूप बारकाईने निरीक्षण करतात. मी काय घालते, कशी वागते, कोणते चित्रपट करते, माझी कोणत्याविषयावर काय मतं आहेत, असे सगळेच खूप गांभीर्याने माझे चाहते पाहतात.त्यामूळे स्टार झाल्यावर चाहत्यांची जास्त काळजी घेणं, गरजेचं असल्याचं उमगलंय. माझ्या चाहत्यांमूळे मला एक मोठं कुटूंब मिळालंय. जे माझी काळजी करतात. त्यामूळे मी स्वत:ला खूप लकी समजते. "

[caption id="attachment_47020" align="aligncenter" width="1080"] Amruta Khanvilkar[/caption]

वाढदिवसाचे काय प्लॅन्स आहेत? कुटूंबासोबत काही खास सेलिब्रेशन असेल का?  असे विचारल्यावर अमृता म्हणाली, "यंदा मी माझ्या कुटूंबियांना सांगितले आहे की, मी तुमच्यासोबतच इतकी वर्ष  वाढदिवस साजरा करत आले, त्यामूळे यंदा माझ्या 'एक्सटेंडेड फॅमिली' ला वेळ द्यायचा मी ठरवला आहे. म्हणूनच माझ्या चाहत्यांसाठी खास  'मीट अॅन्ड ग्रीट' चे आयोजन केेले. सुपरडान्सर महाराष्ट्रच्या सेटवर छोट्यांच्यासोबत मी वाढदिवस साजरा करणार आहे."
'..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' ह्या सिनेमामध्ये अमृताने अभिनेत्री संध्या ह्यांनी अजरामर केलेली पिंजरा सिनेमातली लावणी सादर केली. त्यावर रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, ह्याविषयी अमृता सांगते, "मला ह्या लावणीनंतर भरघोस प्रतिसाद मिळाला. आणि मला आनंद आहे की, संध्याजींच्या गाण्यावर परफॉर्म करायचे, शिवधनुष्य मी लीलया पेलेले.  मराठी अजरामर गीतांमध्ये माझ्या पिंजरा आणि नटरंगच्या लावणीचे नाव घेतले जाते, ह्याचा मला  अभिमान आहे."

[caption id="attachment_43455" align="aligncenter" width="1080"] Amruta Khanvilkar[/caption]

यंदाचं वर्ष अमृतासाठी भरपूर चांगल्या प्रोजेक्ट्सचं असल्याचं ती सांगते, "सध्या सुपर डान्सर महाराष्ट्रमध्ये मी परिक्षक आहे. हा सिझन डिसेंबरमध्ये संपेल. त्यानंतर मी सचिन कुंडलकरसोबत एक सिनेमा करतेय ज्यात सई ताम्हणकरही आहे. सई आणि मी ब-याच काळापासून मैत्रिणी आहोत. पण एकत्र काम करायचा योग कधी आला नव्हता. आता पहिल्यांदा एकत्र काम करू. ह्या सिनेमाची नवी वर्षापासून तयारी सुरू होईल. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मोबाईल कॅमे-यावर होईल. "
https://www.youtube.com/watch?v=3_U-nJik_Qs

Recommended

PeepingMoon Exclusive