By  
on  

या मराठमोळ्या अभिनेत्रीला विचारलं जातंय, 'तुला करोना झालाय का?'

जगाबरोबरचं देशभरात करोनाचा धुमाकुळ वाढत चालला आहे. सर्वच सरकारी यंत्रणा या विषाणूसोबत लढण्यासाठी युध्द पातळीवर काम करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे तब्बल 21 दिवस देश लॉक डॉऊन करण्याचा ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आपणही एक सुजाण नागरिक म्हणून त्यांना यात संपूर्ण सहकार्य देणं अपेक्षित आहे. 

दरम्यान, मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला आलेला एक कटू अनुभव तिने सांगितला. या करोना संदर्भात अभिज्ञाला फोन येऊ लागले आहेत, तसेच मेसेजवरसुध्दा तिला तुला करोनाची लागण तर झाली नाही ना अशी विचारणा होऊ लागली. या संदर्भातला एक व्हिडीओ अभिज्ञाने नुकताच इन्स्टाग्रामवरुन शेअर केला असून सर्वांनी करोनापासून बचाव करावा असं ती म्हणतेय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेमांगी दिनाचा शुभेच्छा️ #prem #onlyprem

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

अभिज्ञा म्हणते, "माझी आई बाबांकडे दुबईला गेली होती. ती 18 मार्चला भारतात आली. विमानतळावर तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या. त्यानंतर ती घरी आल्यावर तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यास सांगितलं होतं, म्हणून आम्ही इतर दुस-या घरात राहिला आलो. पण लोकांना मलाच करोना झालाय असं वाटू लागलं व त्यांनी फोन्सचा भडीमार सुरु केला. त्यांना बहुतेक अजूनही करोना व क्वारंटाईनमधला फरक समजत नाही."

 
 

 

Recommended

PeepingMoon Exclusive