Video: रिंकू राजगुरु लाटतेय पोळ्या, म्हणतेय आईला घरकामात मदत करा

By  
on  

देशासमोर उभ्या ठाकलेल्या करोनासारख्या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्या सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. देशभऱात करोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, त्याला लवकरात लवकर आळा घालणे गरजेचे आहे. आता संपूर्ण देश पंतप्रधानांनी २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. 

या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सक्तीने फक्त घरीच थांबणे अनिवार्य आहे. एरव्ही कामाच्या गडबडीत वेळ नाही वेळ नाही म्हणून ओरडणा-यांनी आता स्वत:साठी , कुटुंबियांसाठी मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. 

नेहमीच बिझी शेड्यूलमधून घरापासून दूर असलेले सेलिब्रिटीसुध्दा घरकामात दंग असलेले या क्वारंन्टाईन काळात सोशल मिडीयाद्वारे पाहाायला मिळाले. कतरिना कैफपासून कार्तिक आर्यनपर्यंत सर्वांनीच घरातली भांडी घासली. आता नुकताच तुमची लाडकी आर्ची फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात रिंकू चक्क पोळ्या लाटताना पाहायला मिळतेय. तसंच तिने यासोबत चाहत्यांना एक खास संदेशसुध्दा दिला आहे." Stay home stay safe. घरी रहा.आईला घर कामात मदत करा,पुस्तकं वाचा,फिल्म बघा,चित्रं काढा,व्यायाम करा.काळजी घ्या. "

रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

 

Recommended

Loading...
Share