Qurantine’ मध्ये बोअर होत आहात? ट्राय करा मिलिंद सोमणचा फंडा

By  
on  

सध्या सगळीकडे एकच शब्द ऐकू येतो तो म्हणजे लॉकडाऊन. या एका शब्दाने सध्या प्रत्येकाचं आयुष्य व्यापलं आहे. करोनाने आज जवळपास प्रत्येकालच घरी बसण्यास भाग पाडलं. करोनामुळे आजपर्यंत जवळपास तीन अब्ज लोक घरात बंदिस्त आहेत. 
पण घरात असताना आणि बाहेर फिरण्याची कोणतीही संधी नसताना फिटनेसचे बारा वाजणं सहाजिक आहे.

 

 

पण अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण मात्र फॅन्सना हटके फिटनेस मंत्रा दिला आहे. यावेळी शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये अंकिता मिलिंदच्या पाठीवर बसली आहे. आणि मिलिंद पुश अप्स मारत आहे.

 

 

 

विशेष म्हणजे मिलिंद उत्तम धावपटू आहे. पण सध्या देश लॉकडाऊन असल्याने मिलिंद धावण्यास जाऊ शकत नाही. मिलिंद स्विमिंग पुलमध्ये अंडरवॉटर धावण्याचा सराव करताना दिसत आहे. यावेळी मिलिंदने चाहत्यांना एक्सरसाईजसाठी बाहेर न जाता घरीच हटके फंडा आजमावण्याचा सल्ला दिला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Day 6. Plain, simple, slightly warmed up, coconut oil for my hair

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

 

मिलिंद गेले आठ दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. या दरम्यान तो आणि अकिंता नेटिझन्सना सोशल मिडियाच्या माध्यमातून फिटनेस गोल्स देत आहे.

Recommended

Loading...
Share