सगळीकडे लॉकडाऊन असताना रितेश देशमुखला पडलाय हा प्रश्न

By  
on  

सध्या लॉकडाऊनचा माहोल सर्वत्र आहे. यामध्ये प्रत्येकजण घरी बसून मन रमवण्याचा काहीना काही फंडा शोधून काढत आहेत. काही जण एक्सरसाईजमध्ये वेळ घालवत आहेत तर काही कुकिंगमध्ये मन रमवत आहे. अर्थातच हे सगळं नेटिझन्सशी शेअरही करत आहेत. 
पण या दरम्यान अभिनेता रितेश देशमुखला मात्र एक वेगळाच प्रश्न पडला आहे.

 

 

एका मजेशीर व्हिडियोमध्ये रितेश त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत बसला आहे. या दरम्यान तो प्रश्न विचारतो की, ‘मला हे लक्षात येत नाहीये की, इंटरनेट फ्री आहे की आपण सगळे?’ पण सध्याची परिस्थिती पाहता रितेशच्या या मजेशीर प्रश्नात बरंच तथ्य आहे. करोनामुळे आज प्रत्येकजण स्वत:च्या घरात कैद झाला आहे. आजपर्यंत जवळपास तीन अब्ज लोक घरात बंदिस्त आहेत. करोनाचा हा प्रकोप कमी होण्याची प्रत्येक स्तरातून प्रार्थना केली जात आहे.

Recommended

Loading...
Share