दिग्दर्शक संजय जाधव यांनी धरला लेकीसोबत ताल, Video पाहा

By  
on  

सध्या करोनाच्या प्रभावामुळे संपुर्ण देश लॉकडाऊनच्या छायेत आहे. अनेक उद्योगधंदे बंद असल्याने बरेच लोक घरी आहेत. सिनेमा आणि मालिकांचं शुटिंगही बंद असल्याने कलाकार घरीच आहेत. अनेकजण त्यांचा वेळ कुकिंग करून, एक्सारसाईज करून घालवत आहेत. दिग्दर्शक संजय जाधव यांनी त्यांचा वेळ घालवण्यासाठी हटके फंडा आजमावला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Family time with Daughter @dancingsimba & missing my dear friend @umeshjaadhav lets stay home stay safe

A post shared by Sanjay S Jadhav (@sanjaysjadhav) on

 

विशेष म्हणजे संजय यांना साथ दिली आहे लेक धृती हिने. संजय आणि धृतीने वाट बघतोय रिक्षावाला या गाण्यावर नृत्य केलं आहे. लेकीच्या एनर्जीसोबतच संजय यांची एनर्जीही धमाल आहे. संजय यापुर्वी ‘खारी आणि बिस्कीट’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. विशेष म्हणजे धृती कोरिओग्राफर आहे त्यामुळे वडिल संजय यांना तालावर नाचवणं तिला फारसं अवघड गेलं नसावं हेच खरं.

Recommended

Loading...
Share