जागतिक रंगभूमी दिन: अभिनेता वैभव तत्ववादी यासाठी झाला Nostalgic

By  
on  

आज जगभरात जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जात आहे. करोनाचं सावट पाहता अनेक कलाकार हा दिन आठवणींना उजाळा देऊन साजरा करत आहेत. आपल्या रंगभूमीच्या सानिध्यातील वेगवेगळे फोटो शेअर करून शुभेच्छा देत आहेत. अभिनेता वैभव तत्ववादीनेही असा एक व्हिडियो शेअर करुन चाहत्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

वैभवने त्याच्या कॉलेजच्या दिवसातील नाटकाचा काही भाग सोशल मिडियावर शेअर केला आहे. वैभवने इंजिनिअरींग कॉलेजमधील ‘खेळ मांडला’ या नाटकात केलं होतं. 2010मधील नाटकाचा व्हिडियो त्याने अपलोड केला आहे. वैभव अलीकडेच ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी सिनेमात दिसला होता. आता तो काजोलच्या ‘त्रिभंगा’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share