By  
on  

Corona virus च्या टेन्शनवर घ्या लाफ्टर थेरपी, पाहा हे सिनेमे

Lockdown मध्ये वेळ कसा घालवायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक सिनेमांची अशी लिस्ट ज्यामुळे तुम्हाला अजिबात बोअर होणार नाही. पुरेशा डाटासह तुम्ही हे सिनेमे युट्युबवर पाहून आनंद घेऊ शकता. जाणून घ्या कोणकोणतेे सिनेमे आहेत हे..... 

अशी ही बनवा बनवी: 
हा सिनेमा मराठी कॉमेडी सिनेमांमधील माईल स्टोन सिनेमा आहे असं म्हटलं तर चुकिचं होणार नाही. हा सिनेमा आजवर अनेकदा पाहिला गेला असला तरी दरवेळी तितकाच आवडतो. त्यामुळे या लॉकडाऊन पिरियड मध्ये हा सिनेमा पाहायला विसरु नका. हा सिनेमा युट्युबवर पाहू शकता.

 

 

बिनकामाचा नवरा: 
रंजना आणि अशोक सराफ हे विनोदाचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या सिनेमात या दोघांसोबत निळू फुले देखील विनोदाचा तडका लावतात. गावातील राजकारण आणि त्याभोवती फिरणारी कथा हा सिनेमा रंजक बनवते. हा सिनेमा युट्युबवर पाहू शकता.

 

 

गाढवाचं लग्न: 
मकरंद अनासपुरे यांचा सिनेमा म्हणजे विनोदाची पर्वणी असते. हा सिनेमा त्याला अपवाद नाही. या सिनेमात मकरंदने कुंभाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा सिनेमाही तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसायला भाग पाडेल. हा सिनेमा युट्युबवर उपलब्ध आहे. 

 

 

ये रे ये रे पैसा: 
नवीन आणि फ्रेश कॉमेडी पाहायची असेल तर हा सिनेमा पाहायलाच हवा. अचानक घडणारी घटना आणि त्यातून वाढत जाणारा गुंता. तुम्हाला हसण्यास भाग पाडेल. हा सिनेमा युट्युबवर पाहू शकता. 

 

 

गुपचुप गुपचुप: 
अशोक सराफ आणि रंजना हे डेडलिस्ट कॉम्बिनेशन या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहे. रंजना याचा डबल रोल, अशोक सराफ यांनी साकारलेले प्रोफेसर धोंड हे देखील कायम लक्षात राहतात. याशिवाय कुलदिप पवार, महेश कोठारे, श्रीराम लागू यांच्या भूमिकाही उत्तम आहेत. हा सिनेमा युट्युबवर उपलब्ध आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive