By  
on  

अभिनेत्री स्पृहा जोशीने मानले तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीचे आभार

सध्या करोनामुळे देश लॉकडाऊनच्या छायेत आहे. अशावेळी शासनाकडून घरीच राहण्याच आवाहन केलं जात आहे. शुटिंग बंद असल्यानेअ भिनेत्री स्पृहा जोशीही घरीच आहे. यावेळी स्पृहाने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. स्पृहाने क्वारंटाईनमध्ये मन रमवण्याचा बराच प्रयत्न केला. पण तिच्या मनाला शांती मिळाली ती आईचा आवाज ऐकून. यावेळी स्पृहाने तिच्या आयुष्यातील आईच्या अमुल्य योगदानाचे आभारही मानले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gratitude Diary #Quarantine #Day5 . What sound are you grateful for today? . याबद्दल मी आज दिवसभर खूप विचार केला. Otherwise मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये एखादा pleasing sound कानावर पडणं, हे जरा अशक्यच आहे.. हॉर्न च्या कचकचटातून कधी एकदा घरी पोहोचतो, असं होतं. पण सध्या आपण आपापल्या घरात लॉक डाऊन असताना कुठलेच आवाज कानावर पडत नाहीत, हा एक दुसऱ्या टोकाचा प्रॉब्लेम होऊन बसलाय. मी सकाळ पासून काय काय केलं.. माझ्या आवडत्या गाण्यांची प्ले लिस्ट लावली.. मेडीटेशन म्युझिक लावून पाहिलं.. म्हटलं यात ' तो ' साऊंड सापडतोय का बघूया.. पण ' तो' आवाज सापडायचं काही चिन्ह नव्हतं. शेवटी दिवस संपला आणि अगदी झोपायच्या वेळेला फोन वाजला. माझ्या आईचा फोन होता.. तिचं ते नेहमीचं ' हॅलो ' कानावर आलं, आणि suddenly माझ्या लक्षात आलं, की हाच तर तो आवाज आहे. माझ्या ओळखीचा, माहितीचा.. तो आवाज कानावर पडला की अचानक सगळं सोपं वाटायला लागतं. त्या आवाजाला आपण तो आपल्या आयुष्यात आहे यासाठी कधीच थँक्यू म्हटलेलं नाही. तो आवाज माझ्या आईचा! I am grateful for this sound today. तुम्हाला कुठल्या आवाजाबद्दल कृतज्ञ वाटतं मला नक्की सांगा. - स्पृहा ️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

स्पृहा म्हणते, ‘What sound are you grateful for today?याबद्दल मी आज दिवसभर खूप विचार केला. Otherwise मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये एखादा pleasing sound कानावर पडणं, हे जरा अशक्यच आहे.. हॉर्न च्या कचकचटातून कधी एकदा घरी पोहोचतो, असं होतं. पण सध्या आपण आपापल्या घरात लॉक डाऊन असताना कुठलेच आवाज कानावर पडत नाहीत, हा एक दुसऱ्या टोकाचा प्रॉब्लेम होऊन बसलाय. मी सकाळ पासून काय काय केलं.. माझ्या आवडत्या गाण्यांची प्ले लिस्ट लावली.. मेडीटेशन म्युझिक लावून पाहिलं.. म्हटलं यात ' तो ' साऊंड सापडतोय का बघूया.. पण ' तो' आवाज सापडायचं काही चिन्ह नव्हतं.

शेवटी दिवस संपला आणि अगदी झोपायच्या वेळेला फोन वाजला. माझ्या आईचा फोन होता.. तिचं ते नेहमीचं ' हॅलो ' कानावर आलं, आणि suddenly माझ्या लक्षात आलं, की हाच तर तो आवाज आहे. माझ्या ओळखीचा, माहितीचा.. तो आवाज कानावर पडला की अचानक सगळं सोपं वाटायला लागतं. त्या आवाजाला आपण तो आपल्या आयुष्यात आहे यासाठी कधीच थँक्यू म्हटलेलं नाही. तो आवाज माझ्या आईचा! I am grateful for this sound today.
तुम्हाला कुठल्या आवाजाबद्दल कृतज्ञ वाटतं मला नक्की सांगा.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive