‘दुनियादारी’च्या दिग्याने चाहत्यांना केलं खास आवाहन

By  
on  

सध्या करोनाने जगभर थैमान घातलं आहे. देशातही करोनाला आवर घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशा वेळी सर्वजण घरी राहणं पसंत करत आहेत. सिनेमागृह, नाट्यगृहही बंद आहेत. याशिवाय मालिका, सिनेमा, वेबसिरीज यांचही शुटिंग बंद आहे. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय विमानांचं उड्डाणही रद्द केलं गेलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari) on

 

यादरम्यान अनेक सेलिब्रिटी समोर येऊन लोकांना घरीच राहण्याचं आवाहन करत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील, बॉलिवूडचे तसेच अनेक मालिकांमधील कलाकारही चाहत्यांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेता अंकुश चौधरीनेही खास अंदाजात चाहत्यांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. अंकुशने दिग्याच्या व्यक्तिरेखेतील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच दिग्याने एक मेसेजही चाहत्यांना दिला आहे. तो म्हणतो, ‘ दिग्या दारु पितो, सिगरेट ओढतो, राडा करतो.हे सगळं चुकिचंच आहे. पण दिग्या कसाही असला तरी दिग्या #Lockdown मध्ये बाहेर पडत नाही यार.... दिग्याचा हा अंदाज चाहत्यांना आवडत आहे.

Recommended

Loading...
Share