अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिला मदतीचा हात, शेअर केली ही पोस्ट

By  
on  

सध्या करोनामुळे जगाचं धाबं दणाणलं आहे. मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशानांही या विषाणुने जेरीस आणलं आहे. भारतही याला अपवाद नाही. भारतात सध्या करोनाग्रस्तांची संख्या 979 आहे तर महाराष्ट्रात 193 रुग्ण करोनाबाधित आहेत. करोनाच्या वाढत्या प्रकोपापासून वाचण्यासाठी पंतप्रधान मोदींनीही देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात सगळ्यामध्ये अडचण होत आहे. ती हातावर पोट असलेल्यांची. देशाच्या विविध भागातील मजुर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.

 

 

 अशा लोकांच्या मदतीला बॉलिवूड आणि मराठी सिनेमातील अनेक कलाकार धावून आले आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही अशा लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सोनाली मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत ऑनलाईन ट्रान्सफर केली आहे. मदतीच्या रकमेविषयी चर्चा होऊ नये यासाठी सोनालीने तिची मदत जाहीर केली नाही.

 

 

या पोस्ट विषयी सोनाली म्हणते, ‘मी देवाचे आणि माझ्या आई-बाबाचे आभार मानते की ह्या कठीण परिस्थितीत माझ्याकडे रहायला घर आहे. चार पैसे,माणसं आहेत. ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये यथाशक्ती रक्कम जमा केली आहे. ती किती आहे यावर चर्चा होवू नये म्हणून सांगत नाही.’ सोनालीच्या या निर्णयाचं नेटिझन्सनी स्वागत केलं आहे.

Recommended

Loading...
Share