मराठी सिनेसृष्टीने जपली बांधिलकी, रंगमंच कामगारांना केली ही मदत

By  
on  

करोनाच्या वाढत्या प्रकोपाने प्रत्येकजण हवालदिल झाला आहे. आज देश लॉकडाऊनच्या छायेत आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच उद्योग बंद आहेत. या बंदची सर्वात पहिली कु-हाड बरसली सिनेमागृह आणि नाट्यगृहांवर. यामुळे याठिकाणी काम कराणा-या कामगारांवर उपासमारीची वेळ आली.

 

 

याशिवाय नाटकच्या प्रयोगादरम्यान बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ या सर्वांच उत्पन रोजच्या प्रयोगांवर अवलंबून असल्याने ते ही थांबलं.या लोकांना मदतीचा हात दिला आहे मराठी कलाकारांनी. सुबोध भावे, रत्नकांत जगताप,सुशांत शेलार, विनोद सातव, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, शिवाजी शिंदे, राजेश देशपांडे, विजू माने  या आणि इतर सर्व कलाकारांनी या कलाकारांसाठी काही दिवस पुरेल इतका शिधा आणि औषधं वगैरे इतर खर्चासाठी रोख रुपये १००० यास्वरुपात मदत करण्याचं ठरवलं आहे. यासोबत चाहत्यांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. यासाठी प्रत्यक्ष एकत्र न जमता ऑनलाईन पेमेंट द्वारे मदत करता येणं शक्य आहे. या ठिकाणी चाहते ऑनलाईन पेमेंट करू शकतात.  

Account details:
रंगमंच कामगार संघ.
कार्पोरेशन बँक, शिवाजी पार्क शाखा.
खाते क्र. 520101006246016.
IFSC कोड CORP0000057.
#कलाकारफॉरमहाराष्ट्र #kalakaaar_for_maharashtra

Recommended

Loading...
Share