'खतरों के खिलाडी 10' मधून अमृता खानविलकर झाली बाद

By  
on  

‘खतरों के खिलाडी’ ह्या  छोट्या पडद्यावरील अॅडव्हेंचर रिएलिटी शोमध्ये जाण्याचा मान आपली मराठमोळी ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकरने पटकावला व जबरदस्त स्टंट करुन तो दिमाखात मिरवलासुध्दा. मात्र अमृताचा ‘खतरों के खिलाडी’मधील प्रवास आता थांबला असून ती आता स्पर्धेच्या बाहेर गेली आहे. 

‘खतरों के खिलाडी’ या शोचे यंदा १०वे पर्व सुरु आहे. या पर्वात करिश्मा तन्ना, करण पटेल, शिविन नारंग, तेजस्वी प्रकाश, कॉमेडियन बलराज स्याल, भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जी, अशा अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले. टास्कच्या गुणांनुसार स्पर्धकांना स्पर्धेत टिकून रहावे लागते. अदा खान व अमृता खानिलकर यांचे गुण बरोबरीचे होते, म्हणून टायनिमित्त दोघींना एक टास्क देण्यात आला, या टायब्रेकर राऊंडमध्ये मगरीच्या पिल्लाला उचलून एका पेटीत ठेवायचे होते. हा  टास्क अदाने पूर्ण केला व हा राऊंड जिंकला अर्थातच अमृताला स्पर्धेबाहेर पडणं भाग होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My first encounter with a #babycroc Thankyou for being so cooperative #akinkkk10 @colorstv #khatronkekhiladi

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

या स्पर्धेचा होस्ट रोहित शेट्टीने अमृताच्या धाडसाची तोंड भरुन स्तुती केल्याचं या निरोपावेळी पाहायला मिळालं. ती एक उत्तम स्पर्धक होती व शो जिंकण्यासाठी तिने खुप मेहनत घेतल्याचंही तो म्हणाला. 

 

Recommended

Loading...
Share