By  
on  

क्वारंटाईन काळात प्रसाद ओकला भेडसावतेय ही चिंता

संपूर्ण जग करोनाशी दोन हात करतंय. भारतातही तबब्ल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. घरात राहून सुरक्षित राहण्याचं सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतेय व करोनासारख्या या जैविक युध्द म्हणवणा-या संकटाशी लढण्याकरिता आपण सर्वांनी खबरदारी म्हणून २४ तास फक्त घरातच राहणं अर्निवार्य आहे, तरच हे युध्द आपण जिंकू शकतो. 

लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरी आहेत व आपापल्या पध्दतीने ते त्यांचा क्वारंटाईन काळ व्यतीत करत आहेत. कोणी वाचनात रमलंय तर कोणी छंद जोपासतंय. पण घर एके घर हेच सध्या सर्वांचं कार्यंक्षेत्र झालं आहे. त्यामुळे रोजच्या दैनंदिन जीवनाबद्दलची एक चिंता अभिनेता प्रसाद ओकला मात्र भेडसावू लागली आहे. प्रसाद ओकने ही मिश्कील पोस्ट नुकतीच पत्नी मंजीरी ओकला उद्देशून शेअर केली आहे. तुम्हाला सुध्दा ती वाचून नक्कीच हसू येईल. तो म्हणतो, कुठे आहात?..., घरी कधी येणार?.. जोवायला आहात ना? हे प्रश्नच जणून ब्रम्हांडातून गायब झाले आहेत. 
खरंय सर्वचजण सध्या आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. त्यामुळे असा प्रश्न उध्दभवूच शकत नाही. ताणतणावाच्या वातावरणात या मिश्कील पोस्टने क्षणभर तुम्हालाही हसू येईल, हे मात्र नक्की! 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@manjiri_oak

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

दरम्यान, आपण सर्वच जण हे सुरक्षित राहण्यासाठी घरी थांबलो आहोत, पण घरी कंटाळा येणं स्वाभिवकच आहे. म्हणून प्रसाद ओकनेत्याच्या इन्स्टाग्रामवरुन जाहीर केलं कि,  २१ दिवस तो दररोज इन्स्टाग्राम पेजवर ४.३० वाजता लाईव्ह येणार आहे. कविता, गाणी व किस्से तुम्हाला तो ऐकवणार. उद्देश फक्त तुमचं मनोरंजन. कारण,  कला हा त्याचा धर्म आहे व तो पाळणारच

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive