By  
on  

coronavirus : लतादीदींचा मदतीचा हात,मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले २५ लाख

करोनाचं सावट सध्या संपूर्ण जगावर आहे. या संकटाशी दोन हात करण्याकरिता आपल्या सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर काम करतायत. तरी भय इथले संपत नाही...दररोज करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होतेय. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा एक हजार २५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे. दुसरीकडं लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं असून उद्योगांसह सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे, यामुळे आर्थिक कोंडीलाही सामोरं जावं लागत आहे.

या संकटाशी सामना करण्यासाठी सर्वच स्तरांतून मान्यवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी योगदान देत आहेत. सेलिब्रिटी, उद्योगपती दानशूरांनी देशबांधवांसाठी मदतीचा हा ओघ सुरुच ठेवला आहे. या यादीत आता आणखी एक मोठं नाव सामिल झालं आहे, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल २५ लाखांची मदत जाहीर केली आहे. 

लता दीदी ट्विटमध्ये म्हणतात,” नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.”

 

लता दीदीं आधी अक्षय कुमार, उद्योगपती रतन टाटा, खेळाडू आदी सर्वच मान्यवरांनी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive