By  
on  

‘हद्दीत राहायचं! दहशतीचं दुसरं नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे येतोय’

रिेतेश देशमुखच्या लय भारी सिनेमाच्या बॉक्स ऑफीसवरील सुपरहिट यशानंतर त्याच्या माऊली या सिनेमाची घोषणा झाली आणि चाहते त्याची आतुरतेने वाट पाहू लागले. आता लवकरच माऊली सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा टिझर आणि गाण्यानंतर रितेशने या सिनेमातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलाय.

‘हद्दीत राहायचं! दहशतीचं दुसरं नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे येतोय,’ असं त्याने ट्विट केलं आहे. या ट्विटसोबतच त्याने या भूमिकेची झलकसुद्धा शेअर केली आहे. घारे डोळे आणि क्रोधित चेहऱ्याची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे.ही खलनायकी भूमिका असल्याचा अंदाज व्यक्त होत असून ती साकारमारा अभिनेता कोण हे अद्याप तरी ओळकता येत नाहीय. फक्त तर्कवितर्क लावत याबाबतची उत्सुकता आता आणखी वाढलीय.

‘लय भारी’ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर या सिनेमातील माऊली या व्यक्तिरेखेवर हा आगामी सिनेमा आहे. पण हा या सिनेमाचा सिक्वल नाहीय. फक्त व्यक्तिरेखेवर आधारित असलेला हा सिनेमा एका वेगळ्या कथानकावर बेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाच्या टिझरमधून रितेश हा पंढरपूरातल्या एका डॅशिंग पोलिसाच्या अवतारात पाहायला मिळला. त्यामुळेच गुंडाराज किंवा भ्रष्टाचाराशी दोन हात करणा-या एका प्रामाणिक पोलिसाची कथा सिनेमात पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1067662015366352897

मुंबई फिल्म कंपनी ही हिंदुस्तान टॉकीजच्या सहयोगाने या सिनेमाची प्रस्तुती करत असून रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत असून सिनेमात रितेशबरोबर अभिनेत्री सयामी खेर झळकणार आहे.

अजय-अतुल या सुपरहिट जोडीच्या संगीताने सजलेला रितेश देशमुखचा ‘माऊली’ येत्या 14 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive