By  
on  

अनुराग कश्यप यांनी मागितली या कारणासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे मदत

सध्या लॉकडाऊनमुळे देशांतर्गत वाहतूक व्यवस्था बंद पडली आहे. अनेकजण मिळेल त्या वाहनाने प्रसंगी पायी गावी चालत जाण्याच्या प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांची अवस्था वाईट झाली आहे. कामधंदा बंद असल्याने उपासमार होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामगार कामाच्या ठिकाणी अडकले आहे. अभिनेता, दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्वीटच्या माध्यमातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे या कामगारांसाठी मदत मागितली. 

 

 

अनुराग यांनी ट्वीट मध्ये ‘हा व्हिडीओ बिहारमधील लोकांचा आहे. जे भिवंडीमध्ये अडकले आहेत. त्यांना कंत्राटदार पैसे देत नाही आणि हे लोक उपाशी आहेत. आपण या लोकांची मदत करण्यासाठी काही करु शकतो का?’ हा प्रश्न विचारत एक व्हिडियोही शेअर केला आहे. अनुराग यांच्या ट्वीटला आदित्य यांनी उत्तर देत मंत्रालयातील कक्षाला आणि ठाणे पोलिसांना यामध्ये टॅग केलं आहे. करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 302 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर देशात 1251 जण करोनाबाधित आहेत.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive