By  
on  

...म्हणून अद्वैत दादरकरला वाटतं लेकीचं कौतुक

करोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. सध्या सर्वत्र देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन सरकारने जाहीर केला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात आहे.

सुरुवातीच्या काळात मंद गती असताना लॉकडाउनच्या काळात करोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली.जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व दैनंदिन व्यवहार आज ठप्प आहेत. सर्वजण घरी राहून  या करोनाशी दोन हात करतायत. घरी राहणं  करोनाला आळा घालणं हाच आता खबरदारीचा उपाय आहे.

सर्व सेलिब्रिटीसुध्दा घरी राहून कुटुंबासोबत वेळ घालवतायत, हे तुम्हाला माहितच आहे. माझ्या नव-याची बायको मधला सर्वांचा लाडका सौमित्र म्हणजेच अभिनेता-दिग्दर्शक अद्वैत दादरकर याने या क्वारंटाईन काळातील एक हद्यस्पर्शी किस्सा सर्वांसोबत सोशल मिडीयावरुन एक क्युट फोटो शेअर करत केला आहे. २८ मार्च रोजी त्याची लाडकी लेक मीराचा पाचवा वाढदिवस होता. पण आता कुठेही बाहेर जाऊ शकत नसल्याने त्यांनी तो घरच्या घरीच साजरा केलीा. पण या बाबत गोंडस मीराने कुठलीच तक्रार बाबाकडे केली नाही, हे विशेष. याच समजुतदारपणाचं अव्दैतला खुप कौतुक आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Meera...♥️ गेल्या ५ वर्षात तुझ्या इतकं प्यूअर काहीच पाहिलं नाही मी..I love you more than anything.. ह्या वर्षी कोरोना मूळे तुझा वाढदिवस घरातच करावा लागला..तरीही तुझी काहीही तक्रार नव्हती..कुठून आणलास एवढा समजूतदार पणा.. पण हे कोरोना वगैरे लवकरच संपणार आणि आपण एलसा ला भेटायला जाणार.. #princess #daughters #purelove #elsa #anna #frozen #stayathome #staypositive #gocorona #fightcorona #5thbirthday #28thmarch @bhakteedesai ♥️

A post shared by Adwaitdadarkar (@adwaitdadarkarofficial) on

अद्वैत म्हणतो, "मीरा  गेल्या ५ वर्षात तुझ्या इतकं प्यूअर काहीच पाहिलं नाही मी..I love you more than anything..ह्या वर्षी कोरोना मूळे तुझा वाढदिवस घरातच करावा लागला..तरीही तुझी काहीही तक्रार नव्हती..कुठून आणलास एवढा समजूतदार पणा.. पण हे कोरोना वगैरे लवकरच संपणार आणि आपण एलसा ला भेटायला जाणार..

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive