सुबोध भावे म्हणतो, '.. तर अभिनयाचा विचारही केला नसता'

By  
on  

सध्या कोरानाने जो देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन काळ जाहीर केला आहे.अत्यावश्यक सेवा व दैनंदिन वस्तू वगळता सर्व व्यवहार ठप्प आहे. प्रत्येक जण घरातच हा क्वारंटाईन काळ आपल्या कुटुंबियांसोबत व्यतित करतोय. हा वेळ घालवण्यासाठी बरेचजण जुन्या आठवणींमध्ये, पौराणिक मालिकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये रममाण झाले आहेत. प्रत्येकाला या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. 

सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध भावेसुध्दा घरी जुने सिनेमे पाहण्यात मश्गुल आहे. त्याने नुकताच कृष्णधवल काळातीला अवघाची संसार हा सिनेमा पाहिला आणि एक ट्विट केलं , ज्यात तो म्हणतोय त्याकाळी जर मी जन्मलो असतो तर अभिनयाचा विचारही केला नसता. कारण त्याकाळी फार दिग्गज व प्रतिभावान कलाकार होते.त्यांच्यापुढे निभाव लागणंच कठीश अशाच आशयाचे हे सुंदर ट्विट त्याने सिनेमावरची प्रतिक्रीया म्हणून केले आहे. 

तर नेटक-यांनी सुबोधच्या या ट्विटवर कॉमेंट्सचा वर्षाव करत म्हटलंय की, सर तुमच्या अभिनयालासुध्दा तोड नाही. 

Recommended

Loading...
Share